RSS  esakal
देश

RSS News : मंदिरातील 'आरएसएस'च्या शाखेवर बंदी; हायकोर्टाचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

रोहित कणसे

केरळच्या तिरुवनंतरतपुरम जिल्ह्यात सरकारा देवी मंदिर परिसरात आरएसएस शाखेबाबात केरळ हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने पोलिसांना मंदिर परिसरात सामूहिक सराव आणि शस्त्र प्रशिक्षण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत येते. मंदिर परिसरात आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिराबाबत भाविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये आरएसएसकडून मंदिराच्या जागेवर अनाधिकृत कब्जा खरून त्याचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते.

याचिकाकर्त्यांच्या सुनावणीनंतर केरळ हायकोर्टाने पोलिसांना मंदिर परिसरात आरएसएसकडून घेण्यात येणारा सामुहिक सराव आणि शस्त्रांते प्रशिक्षण बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जस्टिस अनिल के नरेंद्रन आणि पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने पोलिसांना याबद्दलचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने मंदिर प्रशासनाला देखील निर्देश दिले आहे की अशा कामांसाठी मंदिर परिसराचे वापर होऊ दिला जाऊ नये.

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, कुठल्याही प्रकारच्या सामुहिक सरावासाठी किंवा शस्त्रांच्या प्रशिक्षणाची परवानगी दिली जाऊ नये. कोर्टाने म्हटले खी चिरायिनकीजू पोलिस स्टेशन हा निर्णय लागू करण्यास मंदिर प्रशासनाला मदत करेल. याचिकेत आरएसएसच्या शिबीरामुळे भाविकांना मंदिरात दर्शन करण्यात अडचण येते. खासकरून महिलांना आणि लहान मुलांना विशेष अडचणीचा सामना करावा लागतो. याचिकेत असेही म्हटले होते की दररोज मंदिर परिसरात संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रांचे प्रशिक्षण दिलं जात आहे. याबाबत बोर्डाने पूर्वी देखील सर्कुलर जारी केलं होतं आणि मंदिर परिसर सोडण्याबाबत माहिती दिली होती.

याचिकेत म्हटलं होतं की, आरएसएसचे लोके जोर जोरात घोषणा देऊन आणि वेपनरीच्या ट्रेनिंगमधून मंदिर परिसरातील वातावरण खराब करतात. यामुळे वातावरण अशांत होतं. अनेक वृद्ध, महिला आणि मुले मंदिरात दर्शनासाठी येतात. पण शांती नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागलो. तसेच याचिकेत आरएसएसचे सदस्य मंदिर परिसरात तंबाकू आणि पान मसाला खाऊन थुंकतात ज्यामुळे दुर्गंधी पसरते. याचिकेत आर्टीकल २१ चा उल्लेख करत पूजा करणे सर्वांचा मुलभूत अधिकार असल्याचे देखील सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT