Krishna Janmabhoomi case 
देश

Krishna Janmabhoomi Case : मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण नाहीच! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

रोहित कणसे

मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या खटल्याशी संबंधित सर्व प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करण्याच्या आदेशावर देखील प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे कसे वर्ग केले, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने, अलाहाबाद हायकोर्ट मेंटेनेबिलिटी प्रकरणावर सुनावणी करू शकते, परंतु उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कमिशनरची नियुक्ती होऊ देऊ शकत नाहीत.

यावेळी सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षाच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करत तुमचा अर्ज अतिशय अस्पष्ट असल्याचे म्हटले. तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय बदलीचे प्रकरणही या न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हाला त्यावरही निर्णय घ्यायचा आहे असे सांगितले.

कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीविरोधात मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे.

14 डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणात, याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की त्या मशिदीमध्ये हिंदू प्रतिके आहेत, ज्यावरून ते एकेकाळी हिंदू मंदिर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT