अखेर ठरलं! राज्यात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला मिळणार 'इतक्या' जागा

आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit PawarSakal
Updated on: 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे.राज्यात आणि देशात आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार असल्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामाना आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यादरम्या भाजप राज्यात 32 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यासाठी सत्ताधारी 'एनडीए' आणि विरोधकांची 'इंडिया आघाडी' या दोन्हीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये जागावटपावर चर्चा देखील सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान याचा थेट फायदा काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्षांना होण्याची शक्यता आहे. यादरम्यान महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Thackeray Vs Shinde: दोन्ही गट पुन्हा कोर्टात! ठाकरेंची वकिलांसोबत ४ तास बैठक; नार्वेकरांच्या निकालाची आज होणार चिरफाड

आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, अतुल सावी, राधकृष्ण विखे पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान आजच्या भाजपच्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Ram Kit for Heart Attack : फक्त सात रुपयांत वाचणार हृदयरुग्णांचा जीव! रुग्णांसाठी 'राम किट' ठरणार वरदान

शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आजित पवार गट हा 16 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही आजीत पवार गटाला 6 जागा, तर शिंदे शिवसेना गटाला 10 मिळणार असल्याची साम टीव्हीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunil Tatkare Admits NCP Failure Over Pune Graduates Seat Says Party Wanted Seat Amid Mahayuti Legislative Council Polls
Gokul Election Mahayuti Seat Sharing Dispute Deepens As NCP Gets Another Seat And Fight Erupts Over Yadravkar Group
Kolhapur Gokul election 2026 Mahayuti
Gokul election 2026 Mahayuti seat sharing formula Hasan Mushrif Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com