kulgam esakal
देश

कुलगाम चकमक : पाकिस्तानी दहशतवादी बाबर ठार, पोलीस कर्मचारी शहीद

सकाळ डिजिटल टीम

जम्मू काश्मीर : काश्मीर (kashmir) विभागातील कुलगाम (kulgam) जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (kulgam pariwan encounter) झाली, जी गुरुवारी सकाळपर्यंत चालली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी मारला गेला. ज्याची ओळख बाबर अशी झाली आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी होता.

तीन जवान आणि दोन नागरिक जखमी

शोपियान आणि कुलगाममध्ये 2018 पासून सक्रिय होता. दहशतवाद्यांकडून एक AK-47 रायफल, एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला आहे. तसेच लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी बाबर

परवान भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सुरक्षा दलाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. गराडा कडक झाल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली. ज्यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी बाबर जवानांनी मारला.

पोलीस जवान शहीद, लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिक जखमी

काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी बाबर मारला गेला आहे. त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यात एक पोलीस शहीद झाला आहे. लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिक किरकोळ जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT