PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु; ठाकरेंऐवजी टोपेंची हजेरी | Corona Updates-Modi Takes Meeting with All-State CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates-Modi Takes Meeting with All-State CM

गेल्या २४ तासात जवळपास अडीच लाख नवे रुग्ण देशात आढळून आले आहेत.

PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु; ठाकरेंऐवजी टोपेंची हजेरी

कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेत आहेत. आज सांयकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून आठवड्याभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मोठी बैठक घेत आहेत. गेल्या २४ तासात जवळपास अडीच लाख नवे रुग्ण देशात आढळून आले आहेत. (India Covid Updates) या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित असून त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित आहेत.

कोरोनाचा वेगाने संसर्ग होणारा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) रुग्ण वाढत आहेत. त्यानंतर काही राज्यात नाइट कर्फ्यूसह जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या बैठकीत देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत काय होणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्था सज्जता, कोरोना लसीकरण मोहिम आणि ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या परिणामाचा आढावा घेतला होता. या बैठकीत आरोग्य सचिवांनी जगभरातील रुग्णसंख्येच्या वाढीबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा: योगींना पहिला धक्का देणाऱ्या मंत्री मौर्य यांच्या अटकेसाठी वॉरंट

देशात बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी नव्या रुग्णांची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८४ हजार ८२५ जण कोरोमुक्त झाले. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ११ लाख १७ हजार ५३१ इतकी आहे.

Web Title: Corona Outbreak In India Pm Modi Meeting With All State Cm Today Evening

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top