देश

या हाहाकारासाठी फक्त मोदी सरकार जबाबदार; 'द लॅन्सेट'ची कडवी टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मेडीकल जर्नल लॅन्सेटमध्ये भारतातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर कठोर टीका करण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यापेक्षा ट्विटरवरील टीकेचे ट्विट्स काढून टाकण्यावर मोदी सरकारने अधिक भर दिला असल्याची टीका या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये करण्यात आली आहे. देशात कोरोना संसर्गाचा मोठा स्फोट झाला असून या पार्श्वभूमीवर ‘द लॅन्सेट'ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यापेक्षा टीकाकारांची तोंड दाबण्यास मोदींचं प्राधान्य दिसत असल्याचं असल्याचंही लॅन्सेटनं म्हटलं आहे. कोरोना संकटादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा सरकारचा प्रयत्न हा माफ करण्याजोगा नाहीये, असं देखील या संपादकीय म्हणण्यात आलंय.

पुढे या संपादकीयामध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेनं दिलेल्या इशाऱ्याचा हवाला देण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की, येत्या 1 ऑगस्टपर्यंत भारतात दहा लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होईल, असा अंदाजदेखील यात बांधण्यात आला आहे. जर असं घडलं तर या स्वनिर्मित हाहाकारासाठी केवळ आणि केवळ मोदी सरकारच जबाबदार असेल, असं देखील म्हणण्यात आलंय.

कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रादुर्भावाबद्दल आधीच पूर्वसुचना देऊन देखील सरकारने अनेक धार्मिक कारणासाठी देशभरातून जमून गर्दी करण्यास परवानगी दिली. यासोबतच निवडणुकीसाठी मोठमोठाल्या सभादेखील भरवण्यास परवानगी देण्यात आली. कोरोना संकटाच्या काळात केली जाणारी टीका आणि मोकळ्या चर्चेमध्ये आडकाठी आणण्याची मोदी सरकारची ही वृत्ती अक्षम्य आहे, अशीदेखील घणाघाती टीका लॅन्सेटने केली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा प्रचंड अभाव देशात आहे. केवळ रुग्णसंख्या कमी झाली म्हणून कोरोनावर विजय मिळविल्याच्या फुशारक्या मारण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसहित सरकारने सुरूवात केली. हे सगळं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसह देशात दुसरी लाट येण्याचा इशारा दिला जात असताना सरकारने केलं आहे, अशी घणाघाती टीकादेखील या संपादकीयात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT