"सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज होते बंगालमध्ये, पण राज्यासाठी काहीही केलं नाही"

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या ममतांनी निवडणूक आयोगावरही साधला निशाणा
Mamata-Banerjee
Mamata-Banerjee

कोलकता - ‘‘केंद्र सरकारने (Central Government) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या सहा महिन्यांपासून काहीही काम केलं नाही. पण राज्यात सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने (snatching power) केंद्रीय मंत्री (central ministers) रोज बंगालची वारी करीत होते,’’ अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी विधानसभेत केली. (snatching power Union Ministers visiting every day in Bengal but did nothing for the state says Mamata Banerjee)

Mamata-Banerjee
युएनच्या सुरक्षा परिषदेत भारताचा चीनविरोधात बहिष्कार

विधानसभेच्या अध्यक्षपदी बिमन बॅनर्जी यांची आज सलग तिसऱ्यांदा निवड झाली. यावेळी बोलताना ममतांनी मोदी सरकार व निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला असून विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी मतदानात गैरप्रकार करण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगात सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

भाजपवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, "भाजप ‘डबल इंजिन’ सरकारची भाषा करीत होता, पण तृणमूल काँग्रेसने मतांचे द्विशतक गाठले. निवडणुकीत भाजपने पाण्‍यासारखा पैसा ओतला अन राज्यात कोरोनाचा फैलाव झाला.

Mamata-Banerjee
चीनच्या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कुठे आणि कधी कोसळणार?; अमेरिकन मिलिटरीनं केलं भाकीत

निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचाराचे जे व्हिडिओ भाजपने प्रसारित केले त्यातील ९० टक्के बनावट असल्याचा दावाही त्यांनी केला. विधानसभेत गेल्या ४६ वर्षांत प्रथमच एखाद्या पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या आहेत, असे सांगत नंदीग्रामचा उल्लेख न करता मतदारांचा कौल मान्य असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.

"देशात समान लसीकरण धोरण हवे"

देशात सर्वांना मोफत लसीकरण आणि सर्व राज्यांनी ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. सर्वांच्या लसीकरणासाठी ३० हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असून केंद्रासाठी हा निधी फार नाही. संपूर्ण देशात लसीकरणाचे समान धोरण आखावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com