BJP-JDS Alliance Karnataka Politics  esakal
देश

Loksabha Election : 'भाजप-धजद युतीची अद्याप वेळ आली नाही'; कुमारस्वामींच्या वक्तव्याने खळबळ, BJP बॅकफूटवर?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने धजदसोबत युती केल्यास राज्यात भाजप मजबूत होईल.

सकाळ डिजिटल टीम

धजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.

बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. धजद-भाजप युतीची भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) यांनी शुक्रवारी (ता. ८) घोषणा केली. मात्र, धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी युतीची वेळ अद्याप आली नसल्याचे सांगून अनिश्चितता व्यक्त केली.

जे. पी. नगर (बंगळूर) येथील तिरुमलागिरी मंदिरात विशेष पूजा आणि होम कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत या टप्प्यावर काहीही बोलणार नाही. युतीसाठी योग्य वेळ आलेली नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) युतीची घोषणा करण्यापूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.

अस्तित्वासाठी युती आवश्यक

धजद सुकाणू समितीचे अध्यक्ष, आमदार जी. टी. देवेगौडा यांनी मात्र धजदच्या अस्तितिवासाठी भाजपसोबत युती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याची विनंती मी पक्षाचे ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडा यांना केली आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदार, विधान परिषद सदस्य आणि नेते सहभागी झाले होते. आम्हाला काँग्रेससोबत जायचे नाही. आघाडी सरकारमध्ये कुमारस्वामी यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरून हटवले होते.

येडियुराप्पा यांनी शुक्रवारी सांगितले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने धजदसोबत युती केल्यास राज्यात भाजप मजबूत होईल. युती करून जास्त जागा जिंकणे शक्य आहे. यासंदर्भात नवी दिल्लीत चर्चा सुरू आहे. धजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती करण्यास सहमती दर्शवली आहे. शाह यांनी लोकसभेच्या चार जागा धजदला देण्याचे मान्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT