Love Affair Uttar Pradesh Crime news Husband Wife Lover Love Affair Uttar Pradesh Crime news Husband Wife Lover
देश

पती, प्रियकर दोघांसोबतही राहायचे; महिलेचा पोलिस ठाण्यात हट्ट

सकाळ डिजिटल टीम

मैनपुरी : एक महिला पतीसोबत राहत होती. घराच्या बाजूला तिचा प्रियकरही राहत होता. मात्र, पतीला प्रियकराबद्दल काहीही माहीत नव्हते. महिलेला पती आणि प्रियकर (Love Affair) दोघांपैकी एकालाही सोडायचे नव्हते. प्रियकर तिच्या पतीला कामात मदत करीत असे. एकेदिवशी महिलेचा पती गावात सुरू असलेले भागवत ऐकायला गेला. यानंतर प्रियकर महिलेच्या घरात आला. याची माहिती पतीला मिळाली. पती वाटेतूनच घरी आल्यावर त्यांना नको त्या अवस्थेत बघितले. ही घटना उत्तर प्रदेशात घडली.

पती आणि प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहून दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघेही पोलिस ठाण्यात पोहोचले. महिला पती आणि प्रियकराला सोडण्यास तयार नव्हती. पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, १३ वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. तसेच १३ वर्षांपासून ती प्रियकराशी (Lover) संबंध ठेवत आली आहे.

तीन महिन्यांपासून प्रियकर (Lover) महिलेच्या पतीसोबत एकाच घरात राहत आहे. प्रियकर शेतीचे काम करतो. तुला प्रियकरासोबत राहायचे आहे की पतीसोबत असे पोलिसांनी महिलेला विचारले. यावेळी तिने दोघांसोबत राहण्याचा हट्ट धरला. यानंतर पोलिसांनी पती आणि प्रियकरावरच कारवाई केली.

दुसऱ्या घटनेत शाहजहांपूर जिल्ह्यातील बांदा येथे वीस दिवसांपूर्वी प्रियकरासोबत गेलेल्या विवाहितेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, विवाहिता प्रियकरासोबत जाण्याच्या आग्रहावर ठाम राहिली. बांदा परिसरातील गावातील तरुणाचे शेजारील विवाहितेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध (Love Affair) होते. १७ मे रोजी ती प्रियकरासोबत निघून गेली. पत्नीला शोधण्यासाठी पतीने पोलिसांकडे दाद मागितली. शनिवारी बांदा पोलिसांनी २० दिवसांनंतर प्रियकर आणि प्रेयसीला ताब्यात घेतले. मात्र प्रेयसी प्रियकरासोबत जाण्यावर ठाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT