lover brutally murdered his girlfriend at uttar pradesh 
देश

प्रेयसीला लॉंग ड्राईवला फिरायला घेऊन गेला अन्...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पण, युवकाचे दुसऱया युवतीसोबत विवाह ठरल्यानंतर त्याने पहिल्या मैत्रिणीचा काटा काढण्याचे ठरवले. आपण लॉंग ड्राईवला फिरायला जाऊ असे सांगून गेला आणि तिचा खून केल्याची घटना उघड झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. पण, युवकाचे दुसऱया युवतीसोबत विवाह ठरला होता. यानंतर प्रेयसीला तो टाळू लागला. प्रियकराचा विवाह ठरल्याचे तिला माहित नव्हते. प्रेयसीचा अडथळा दूर करण्यासाठी त्याने तिला लॉंग ड्राईवला फिरायला जायचे का म्हणून विचारले. तिनेही तत्काळ होकार दिला. दिल्लीवरून दोघेजण मोटारीतून उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याने युवतीचा गळा कापून खून केला आणि मृतदेह फेकून दिल्यानंतर परत माघारी परतला. युवती बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियानी दाखल केली होती. युवतीचा मृतदेह मिळाल्यानंतर तो प्रियांका (वय 23) नावाच्या युवतीचा असल्याचे समजले. पुढील चौकशी केल्यानंतर तिचा खून हॅप्पी नावाच्या प्रियकराने केल्याचे समजले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

पोलिस अधिकारी परमिंदर सिंह यांनी सांगितले की, दक्षिण दिल्लीमधील आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेल्या प्रियांकाचा खून केल्याप्रकरणी हिरा सिंह ऊर्फ हॅप्पीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT