साहेब, तिला दुसऱयासोबत लग्न करायचं होत म्हणून...

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

मनावर (मध्य प्रदेश): साहेब, माझं तिच्यावर प्रेम होतं. मला तिच्यासोबत लग्न करायचे होते. पण, तिला दुसऱयासोबत विवाह करायचा होता. यामुळे चिडून तिचा खून केला, असे प्रियकराने पोलिस चौकीत येऊन सांगितले.

यार आय मीस यू, आज फक्त तू मला साथ दे...

मनावर (मध्य प्रदेश): साहेब, माझं तिच्यावर प्रेम होतं. मला तिच्यासोबत लग्न करायचे होते. पण, तिला दुसऱयासोबत विवाह करायचा होता. यामुळे चिडून तिचा खून केला, असे प्रियकराने पोलिस चौकीत येऊन सांगितले.

यार आय मीस यू, आज फक्त तू मला साथ दे...

त्रिकोणी प्रेम प्रकरणातून एकाने युवतीचा खून करून पोलिस चौकीत गेला. पोलिसांनी तेजस अमरनाथ मौर्य (वय 27) यालाताब्यात घेतले आहे. तेजसने पोलिसांना सांगितले की, 'रानू वर्मा (वय 25) हिच्यावर माझे प्रेम होते. परंतु, माझ्यासोबत विवाह करण्यात ती नकार देत होती. तिला दुसऱया युवकासोबत विवाह करायचा होता. तिच्या खोलीवर गेल्यानंतर पुन्हा विवाहाबाबत विचारणा केली. तिने नकार दिल्यानंतर चाकूने भोकसून हत्या केली.'

हनिमूनच्या तयारीत असताना मिळाली पत्नीची 'ती' क्लिप...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तेजसने चौकीत येऊन खून केल्याचे सांगितल्यानंतर तत्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रानूचा मृतदेह पडलेला होता. तिच्या शरीरावर 25 पेक्षा जास्त जखमा आढळून आल्या आहेत. तेजसला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

'त्या' अवस्थेतही दोघे एकमेकांकडेच पाहात होते...

रानू यांच्या शेजारी राहणाऱया नागरिकांनी सांगितले की, 'रानूचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर आम्ही धाव घेतली. पण, दरवाजा आतमधून बंद होता. रानूचा खून केल्यानंतर त्याने खडकीतून बाहेर उडी घेत पळ काढला.'

रुग्णालयात दोघांना रंगेहाथ पकडले अन्...

रानू या कारागृहात नोकरी करत होत्या. तेजसने रागातून तिचा खून केला आहे. रानूने गरिब परिस्थितीतून शिक्षण घेत नोकरी मिळवली होती. शिक्षणाचा खर्च तिचा ती करत होती. नोकरी मिळाल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती बदलली होती. तिचा विवाह आम्ही दुसऱया ठिकाणी करणार होतो. त्यापूर्वीच तिचा खून झाला आहे, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

प्रियकराच्या दुचाकीवर वहिनीला पाहिले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover reached police station in manwar after killed his girlfriend at madhya pradesh