Extra Momo Chutney leads to Crime news 
देश

Extra Momo Chutney : मोमोज खाणं पडलं महागात! एक्स्ट्रा चटणी मागितली म्हणून थेट चाकू हल्ला; घटनेने खळबळ

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक बाबा समोर आली असून रस्त्याच्या बाजूला मोमोज खाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे

रोहित कणसे

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक बाबा समोर आली असून रस्त्याच्या बाजूला मोमोज खाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. येथे गुंडानी एका व्यक्तीला फक्त चटणी मागीतली म्हणून गंभीररित्या जखमी केलं आहे. यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीच्या फर्श बाजार परिसरात झाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भीकम सिंह कॉलनी भागात चटणी मागितली म्हणून चाकूने हल्ला करण्यात आला. एक व्यक्ती येथे मोमोज खात होता मात्र त्यासोबत तो जास्तीची चटणी मागत असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी दुकानदाराची बाजू घेत हा हल्ला केल्याचे मीडिया रिपर्समध्ये म्हटले आहे. या हल्ल्यात तो व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला.

दिल्लीतील भीकम सिंह कॉलनी परिसर हा वर्दळीचा भाग आहे. येथे ग्राहकाने मोमोज सोबत जास्तीची चटणी मागीतल्याने मोमोज कॉर्नर मालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. यावादात हा चाकू हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये ग्राहक जखमी झाला, त्यानंतर त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत, मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT