baby Sakal
देश

माणुसकीला काळीमा! सुरतमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला निर्दयी मारहाण

या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुरत : घरकाम करणाऱ्या महिलेने 8 महिन्यांच्या बाळाला (Med Beat Baby In Gujrat ) मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. ही घटना गुजरातमधील सूरत (Surat) येथे उघडकीस आली आहे. घटनेनंतर चिमुरड्याला उपचारांसाठी रूग्णालयात ( Hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात मधील सूरत येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला जुळी मुले (Twins Baby ) आहेत. त्यांचा संभाळ करण्यासाठी (Care Taker) या दाम्पत्याने संबंधित महिलेला कामावर ठेवले होते. त्यावेळी या महिलेने 8 महिन्यांच्या बाळाला अमानुषपणे मारहाण केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही महिला कधी बाळाला मांडीवर घेऊन तर कधी बेडवर आपटत असल्याचे दिसून आले असून, हा सर्व प्रकार जवळपास दीड तास करण्यात आले आहे. महिलेवर कलम 307 आणि 323 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोरोना चाचणी (Covid Test) आल्यानंतर या महिलेला बेड्या ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT