Rohingya 
देश

आर्थिक दुर्बल घटकांची घर रोहिंग्यांना दिलेली नाहीत; गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

यासंदर्भात आलेल्या बातम्यांवर गृहमंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (EWS) सदनिकांमध्ये रोहिंग्या शरणार्थीची सोय केल्याचं वृत्त खोट असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलं आहे. याबाबत काही वृत्तपत्रांमधून बातम्या छापून आल्या होत्या. (MHA clarifies not to give any direction to provide EWS flats to Rohingyas)

गृहमंत्रालयानं म्हटलं की, बातम्यांमध्ये आलेलं वृत्त हे खोट आहे. भारतात बेकायदा दाखल झालेल्या रोहिंग्या निर्वासितांची सोय दिल्लीतील बक्करवाला येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेली घरांमध्ये करण्यात आलेली नाही. दिल्ली सरकारनं रोहिंग्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, अनेक ट्विट्सद्वारे गृहखात्यानं हे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयानं GNCTD ला आदेश दिलेत की, भारतात बेकायदा प्रवेश केलेल्या रोहिंग्यांना सध्याच्या ठिकाणीच ठेवण्यात आलंय ना? याची खात्री करावी. त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. कायद्यानुसार, देशात बेकायदा दाखल झालेल्या परदेशी नागरिकांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात येतं.

माध्यमांतील वृत्त काय होतं?

माध्यमातील वृत्तांमधील माहितीनुसार, म्यानमारमधील १,१०० रोहिंग्या शरणार्थी बेकायदा भारतात दाखल झाले आहेत. सध्या ते दिल्लीतील तंबूमध्ये राहत आहेत. पण लवकरच त्यांना मुलभूत सोयींनी सुसज्ज फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT