Former Karnataka Minister Gali Janardhana Reddy esakal
देश

Karnataka Election : सीमावाद सुरु असतानाच कर्नाटकात माजी मंत्र्याचा भाजपला धक्का; नव्या पक्षाची केली स्थापना!

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरु असतानाच माजी मंत्र्यानं भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरु असतानाच माजी मंत्र्यानं भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

बंगळुरु : सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra Border Dispute) सुरु असतानाच माजी मंत्र्यानं भाजपला जोरदार दणका दिला आहे. कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) पार पडणार आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय.

कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाण व्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी (Former Karnataka Minister Gali Janardhana Reddy) यांनी भाजपला रामराम करत नवा पक्ष स्थापन केलाय. धर्म, जात आणि फुटीरवादी राजकारणाविरोधात लढणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय.

गेल्या दोन दशकांपासून जी. जनार्दन रेड्डी हे भाजपमध्ये होते. मात्र, आता त्यांनी भाजपपासून वेगळं होत नवीन पक्षाची स्थापना केलीये. ‘कल्याण राज्य प्रगती पक्ष’ (Kalyana Rajya Pragati Paksha (KRPP) असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. नवीन पक्षाची स्थापना करताना रेड्डींनी आपण गंगावती विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचंही जाहीर केलं. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या अवैध खाणकाम प्रकरणी रेड्डी हे 2015 पासून जामिनावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT