चीन-पाकिस्तान एकत्र येऊन युद्ध केल्यास भारताचं मोठं नुकसान; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा I Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi vs Modi Government

'लष्कराबद्दल आम्हाला फक्त आदरच नाही, तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीही आहे.'

Rahul Gandhi : चीन-पाकिस्तान एकत्र येऊन युद्ध केल्यास भारताचं मोठं नुकसान; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

Bharat Jodo Yatra News : 9 डिसेंबरला भारत-चीन सैनिकांमध्ये (India-China Soldiers) मोठी चकमक झाली होती. यामध्ये दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर विरोधक केंद्र सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही रविवारी पुन्हा एकदा केंद्रावर जोरदार टीका केलीये.

राहुल गांधी म्हणाले, चीन आणि पाकिस्तान (Pakistan) एकत्र तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत युद्ध झालं तर ते दोन्ही देशांच्या विरोधात असेल. यात आपल्या देशाला (भारताला) मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) एका यूट्यूब चॅनलशी बोलताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय.

हेही वाचा: Ramdas Athawale : सोनियांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही; रामदास आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट

ते पुढं म्हणाले, चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. जर युद्ध होणार असेल तर ते दोघांमध्ये होईल. अशा परिस्थितीत भारताचं मोठं नुकसान होईल. भारत आता खूपच कमकुवत आहे. मात्र, लष्कराबद्दल आम्हाला फक्त आदरच नाही, तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीही आहे. लष्कराशिवाय या देशाची कल्पनाही करता येणार नाही, असं गांधींनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Jammu Kashmir : दहशतवादाविरोधात SIA ची मोठी कारवाई; सरकारनं फुटीरतावादी नेत्याचं घर केलं सील

पूर्वी आमचे दोन शत्रू चीन आणि पाकिस्तान होते. त्यांना वेगळं ठेवण्याचं आमचं धोरण होतं. पण, आता आमची लढाई पाकिस्तान, चीन आणि दहशतवादाशी सुरू आहे. या तिघांनी मिळून आज मोर्चेबांधणी केलीये. अशा स्थितीत युद्ध झालं तर ते दोघांमध्येही होईल. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही एकत्र काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.