Belgaum Airport esakal
देश

बंगळूर, हुबळी, बेळगाव विमानतळाची नावं बदलणार? 'या' महान व्यक्तींच्या नावासाठी आमदार आग्रही

संगोळी रायण्णा आणि कित्तूर चन्नम्मा यांनी देशासाठी अतुलनीय योगदान दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव द्यावे आणि बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली.

बेळगाव : हुबळी येथील विमानतळ (Hubli Airport) क्रांतिवीर संगोळी रायण्णा (Sangolli Rayanna) आणि बेळगाव येथील विमानतळाला वीरराणी कित्तूर चन्नम्मा (Kittur Rani Chennamma) यांचे नाव देण्याची मागणी के. एच. कोनरेड्डी यांनी विधानसभेत केली.

आमदार कोनरेड्डी यांनी संगोळी रायण्णा आणि कित्तूर चन्नम्मा यांनी देशासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. यामुळे त्यांचे नाव हुबळी आणि बेळगाव येथील विमानतळांना मिळावे, अशी सभागृहातील आमदारांची अपेक्षा आहे. शिवाय यासंदर्भात अनेकदा विविध व्यासपीठावरून चर्चाही झाल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारने या संदर्भातील प्रस्ताव आणून मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

अरविंद बेल्लद यांनी बंगळूर विमानतळाला केम्पेगौडा यांचे नाव देण्यात यावे, अथवा आमच्या प्रादेशिक नेत्याचे नाव द्यावे, हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव द्यावे आणि बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. प्रश्नांना उत्तरे देताना कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी राज्यातील विविध विमानतळांना नावे देण्याबाबत मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT