मोठी बातमी! दारू पिऊन झिंगत असतानाच पोलिसांचा डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर छापा; चार नर्तिकांसह 13 जणांवर कारवाई

एका रिसॉर्टवर डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर (Doctor High Profile Party) पोलिसांनी काल रात्री छापा टाकला.
Doctor High Profile Party
Doctor High Profile Partyesakal
Summary

सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहाथ पोलिसांना सापडले.

भिलार : भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील निसर्गरम्य ठिकाणावरील एका रिसॉर्टवर डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर (Doctor High Profile Party) पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. यात चार नर्तिकांसह सुमारे तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यामध्ये सहा डॉक्टरांचा समावेश असून, ते दहिवडी, कऱ्हाड, मिरज येथील आहेत, तर फार्मासिस्ट पुण्यातील आहेत. या हायप्रोफाइल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू होती. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही धडक कारवाई केली.

Doctor High Profile Party
लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच, 'या' विद्यमान खासदारांनाच मिळणार तिकीट; शिवतारेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून (Panchgani Police Station) मिळालेली अधिक माहिती अशी, की पाचगणीजवळच असणाऱ्या कासवंड गावातील एक रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर युवतींची तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आंचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्याहून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे दाखल झाले.

रात्री दहाच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील रिसॉर्टच्या तळमजल्यात पथकाने घटनास्थळी छापा टाकताच सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहाथ पोलिसांना सापडले. त्यावेळी नर्तिका नाचत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला, त्यांच्यासमवेत नाचणारे सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्ट चालक, वेटर अशा तेरा जणांच्या विरोधात कारवाई करत ताब्यात घेतले.

Doctor High Profile Party
'Ph.D करून काय दिवे लावणार?' अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची केली मागणी

पाचगणी पोलिस ठाण्यात यातील सहभागी हॉटेल चालक विशाल सुरेश शिर्के (वय ३६, रा. पसरणी, ता. वाई), वेटर उपेंद्र ऊर्फ कृष्णा दयावंत प्रसाद कोल (वय ३१, रा. कासवंड) डॉ. रणजित तात्यासाहेब काळे (वय ४३, दहिवडी, ता. माण), डॉ. नीलेश नारायण सन्मुख (वय ३९, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज, जि. सांगली), फार्मासिस्ट प्रवीण शांताराम सैद (वय ४०, रा. आलडीया, माळुंगे पाडळे, पुणे, ता. मुळशी, जि. पुणे), डॉ. मनोज विलास सावंत (वय ४०, रा. दहिवडी, ता. माण), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय ४०, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय ३१, रा. गोंदवले, ता. माण), डॉ. हनुमंत मधुकर खाडे (वय ६५, रा. दहिवडी, ता. माण) या नऊ जणांना पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

Doctor High Profile Party
विचित्र योगायोग! 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला अन् आता..; धैर्यशील मानेंनी सांगितला 'मातोश्रीं'बाबत थरारक अनुभव

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, हवालदार गणेश जाधव, विशाल कोरडे, नीलेश जांभळे, उदय यादव, शुभम चव्हाण तसेच पाचगणीचे सहायक निरीक्षक राजेश माने व सहकारी यांच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com