देश

Mohali MMS Leak : वॉशरूममधून असा बनवला गेला MMS?; समोर आल्या गंभीर त्रुटी

सकाळ डिजिटल टीम

Mohali MMS Leak : चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीकच्या घटनेनंतर देशात खळबळ माजली असून, या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता या हॉस्टेलच्या बाथरूमचे काही फोटो समोर आले असून, त्याद्वारे नव नवे दावे केले जात आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडीओ बनवून ते तिच्या कथित प्रियकराला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पूर्वी वसतिगृहात राहत होती मुले

सध्या राहत असलेल्या या वसतिगृहात पूर्वी मुले राहत होती. त्यामुळेच येथे तयार केलेल्या वॉशरूममधील वरच्या भागात छत नाहीये. तसेच दाराखालील बराच भाग मोकळा आहे. त्यामुळे कुणाही येथून व्हिडिओ अगदी सहज शुट करू शकतो. ज्यावेळी हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी मुलींच्या दृष्टीने वॉशरूममध्ये जे आवश्यक बदल करणे गरजेचे होते. ते करण्यात आले नव्हते असा आरोप मुलींनी केला आहे.

वेळीच बदल केले असते तर, असा प्रकार घडला नसता

दरम्यान, ज्यावेळी हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी जर, सुरक्षेच्या दृष्टीने या बॉशरुममध्ये आवश्यक बदल केले असते तर, अशा प्रकारची लाजीरवाणी घटना घडली नसती असे मत अनेक मुलींनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, तिचा प्रियकर सनी मेहता आणि सनीचा मित्र रंकज वर्मा यांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT