Delhi : CM शिंदे उद्या पुन्हा दिल्ली दरबारी; काय खलबतं शिजणार?

शिंदेंसोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील दिल्लीला जाणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

Eknath Shinde Delhi Tour : एकीकडे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंसोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Eknath Shinde
Video : नोएडामध्ये मोठा अपघात; भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

दिल्ली दौऱ्यासाठी शिंदे आणि इतर दोन मंत्री उद्या दुपारी दिल्लीत दाखल होणार असून, या दौऱ्यादरम्यान ते गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मंत्र्याशिवाय संदीपान भूमरेदेखील दिल्लीला जाणार आहेत.

Eknath Shinde
Vedanta : वेदांता प्रकल्पासाठी मविआने पैसे घेतले? अजित पवार स्पष्टच बोलले

राज्याच्या विकासासाठी केंद्रातर्फे जी आवश्यक मदत हवी आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण नुकताच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर येथून पुढे राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ देण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde
Video : नोएडामध्ये मोठा अपघात; भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

दरम्यान, दुसरीकडे राज्यातील दुसरा मंत्रीमंडळ विस्तारदेखील रखडला आहे. तो केव्हा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या दौऱ्यादरम्याव शिंदे गडकरी आणि दानवे यांच्यासोबत विस्ताराबाबत काही चर्चा करणार का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com