Mohammed Zubair funding Pakistan Syria delhi Police Mohammed Zubair funding Pakistan Syria delhi Police
देश

जुबेरला पाकिस्तान, सीरियातून निधी मिळाला; दिल्ली पोलिसांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी (ता. २) पटियाला हाउस कोर्टात हजर केले. पोलिसांनी दावा केला की, मोहम्मद जुबेर यांना पाकिस्तान (Pakistan) आणि सीरियातून विदेशी देणग्या मिळाल्या होत्या. गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी आपल्या फोनचा डेटा डिलीट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी सांगितले की, फोन फॉरमॅट करणे बेकायदेशीर नाही.

जामिनाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना पाकिस्तान (Pakistan) आणि सीरियातून (syria) देणग्या मिळाल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता हे प्रकरण केवळ साधे ट्विट नाही. आरोपी प्रवदा मीडियाचा संचालक आहे. त्याने हुशारीने सर्व काही हटवले. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी फोनमधील डेटा डिलीट केला आहे.

मला एफआयआर आणि फोन सादर न केल्याची माहिती नव्हती. फोन फॉरमॅट करणे बेकायदेशीर नाही. हे शस्त्र किंवा दारूगोळा किंवा कोणतीही औषधे नाही. मी यावर गंभीर कायदेशीर आणि घटनात्मक आक्षेप नोंदवू शकतो, असे जुबेरचे वकील वृंदा ग्रोव्हर म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी मोबाईल आणि हार्डडिस्क जप्त केली आहे. परंतु, पोलिसांना अद्याप या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाही. पोलिसांना हे प्रकरण लांबवायचे आहे. पोलिसांची कहाणी रचलेली आहे. ही संपूर्ण कथा २०१८ सालची आहे आणि तीही एका जुन्या ट्विटची घटना आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस इतरत्र जात आहेत, असे जुबेरच्या (Mohammed Zubair) वकिलाने सांगितले.

जुबेर यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा ते फोन घेऊन आले होते. त्यांची तपासणी केली असता ते त्या दिवसापूर्वी दुसरे सिम वापरत असल्याचे आढळून आले. नोटीस मिळताच त्यांनी सिम काढून नवीन मोबाईलमध्ये टाकला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जुबेर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयपीसीची आणखी कलमे जोडली आहेत. ज्यामध्ये गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्यासोबतच FCRA चे कलम ३५ देखील जोडले होते. जुबेर यांच्यावर विदेशातून देणग्या घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जुबेर यांचा मोबाईल फोन आणि हार्ड डिस्क जप्त केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT