ममता बॅनर्जी म्हणाल्या, द्रौपदी मुर्मूबद्दल अगोदर सांगितले असते तर...

Mamata Banerjee Draupadi Murmu president election kolkata bjp
Mamata Banerjee Draupadi Murmu president election kolkata bjpMamata Banerjee Draupadi Murmu president election kolkata bjp

कोलकाता : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या उमेदवारीबाबत एनडीएने आधीच माहिती दिली असती तर आम्हीही मान्य केले असते. तसेच त्यांची एकमताने निवड होऊ शकली असती, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. टीएमसीचा राजीनामा देणारे यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

भाजपने आमचे मत जाणून घेतले. परंतु, त्यांच्या उमेदवाराबद्दल काहीही सांगितले नाही. असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचे मान्य केले. आम्हाला माहीत असते की त्यांनी आदिवासी महिलेला किंवा अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवायचे आहे तर आम्हीही विचार केला असता, असेही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या.

Mamata Banerjee Draupadi Murmu president election kolkata bjp
नूपुर शर्मावरील टिप्पणी मागे घ्यावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

आदिवासी समाजातील लोकांबद्दल मनात खूप आदर आहे. त्या तर एक स्त्री आहे. आमची १६ ते १७ पक्षांची युती आहे. आम्ही एकटे परत जाऊ शकत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बॅनर्जी (Mamata Banerjee) या दबावात असल्याचे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी सर्वांना त्यांच्या निर्णयावर सहमती दर्शवण्यास सांगितले होते. आता त्या जबाबदारीपासून पळ काढत आहे. त्यांनी यू-टर्न घेतला तर याचा अर्थ त्यांना भाजपचा फोन आला आहे. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दबाव असेल. शेवटी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चांगले संबंध आहेत. आमच्यासाठी भाजपशी लढणे ही तत्त्वांची लढाई आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

Mamata Banerjee Draupadi Murmu president election kolkata bjp
गर्भपाताची गोळी खाल्ल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

उमेदवाराच्या निवडीसाठी खूप सक्रिय

ममता बॅनर्जी या राष्ट्रपतीपदाच्या (president election) उमेदवाराच्या निवडीसाठी खूप सक्रिय होत्या. त्यांच्या वतीने दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. यशवंत सिन्हा यांच्या नावाचा त्यांच्या पक्षाने प्रस्ताव ठेवला होता. ज्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपासह सर्व विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली होती. याआधी फारुख अब्दुल्ला, शरद पवार, गोपाळ कृष्ण गांधी यांना निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यांनी नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com