Rajya Sabha Mp Suspended news Rajya Sabha Mp Suspended news
देश

राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित; दोन दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे मंगळवारी (ता. २६) राज्यसभेतील १९ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी (ता. २५) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्यामुळे आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

संसदेत विरोधक सातत्याने आंदोलन करीत आहेत. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला जात होता.

राज्यसभेत (Rajya Sabha) गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, नदीमल हक, अभि रंजन बिस्वास, शांता छेत्री, आणि डोला सेन हे तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आहेत. तसेच मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित (Suspended) केलेल्या खासदारांपैकी सात खासदार हे टीएमसी पक्षाचे आहेत.

सोमवारी काँग्रेसचे खासदारांना निलंबित

सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांना हंगामासाठी निलंबित करण्यात आले.

काँग्रेसचा संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ

ईडीने मंगळवारी सोनिया गांधी यांची चौकशी केली. ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसने (congress) संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ केला. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला तर काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. याठिकाणी राहुल गांधीही धरणावर बसले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT