The Kashmir Files. MP Badruddin Ajmal  Sakal
देश

'द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला; खासदाराची मागणी

The Kashmir Files : 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

द काश्मिर फाईल्स (Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित हा चित्रपट आहे. दरम्यान एका खासदाराने काश्मीर फाईल्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बदरुद्दीन अजमल (Badruddin Ajmal) असं या खासदाराचे नाव असून ते आसामधील धुबरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात.

"मी काश्मिर फाईल्स पाहिला नाही. केंद्र सरकार, आसाम सरकारने यावर बंदी घातली पाहिजे कारण यामुळे जातीय तणाव निर्माण होईल. सध्याच्या भारतातील परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आसाममधील नेल्लीच्या घटनेसह काश्मीर बाहेर अनेक घटना घडल्या, परंतु त्यांच्यावर कधी चित्रपट आला नाही", असं खासदार बदरुद्दीन अजमल म्हणाले. (MP Badruddin Ajmal has demanded a ban on the film 'The Kashmir Files'.)

द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक वादाला तोंड फुटलंय. या चित्रपटावरून राजकारण चांगलंच तापलंय. काही राज्यांनी हा चित्रपट टॅक्सफ्री केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटावर काल विधान केलं होते. दरम्यान ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल,असं म्हणत बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri) यांनी केलं आहे. पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी या मराठी कलाकारांनी यात भुमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Express Way: मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार, तारीख आली समोर; वेळ वाचणार

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, दहशतवादी तळांवर केले हल्ले; TTPचे अनेकजण ठार

ट्रम्प यांच्याकडून आयातशुल्कात २४ तासात दोनदा वाढ; आधी १० टक्के, आता आणखी ५ टक्के वाढवले

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक

SCROLL FOR NEXT