Jitendra Awhad esakal
देश

Jitendra Awhad : आव्हाड म्हणतात, मला कधीही अटक होऊ शकते; काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत मला आतमध्ये ठेवलं जावू शकतं. केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला तसं सांगितलं असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आव्हाडांनी हा दावा केला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असं ते म्हणाले. हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला खरा मात्र त्यासंबंधीचा कायदा आणण्यासाठी सरकारला कुणीही रोखलेलं नाही. हिंदू मुलींनाच धमक्या देणं योग्य नसल्याचं आव्हाड म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा दावा केला आहे.

यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले की, राज्यावर सध्या साडेसहा लाखांपेक्षा जास्तीचं कर्ज आहे. त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही. अशीच आर्थिक परिस्थिती राहिली तर राज्यात दिवाळखोरी येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा: Budget 2023: महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! आदिवासींसाठी विशेष कार्यक्रम हाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT