Ajit Pawar : 'हा तर चुनावी जुमला', अजित पवारांची अर्थसंकल्पावर तिखट प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले केंद्राच्या तिजोरीत जास्त पैसे जमा करणाऱ्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच नाही
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही राजकीय वर्तुळातून यावर कौतुक केले जात आहे तर काही नेत्यांकडून टीका देखील केली जात आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे.

महाराष्ट्रात आताच्या घडीला निवडणूका नाहीत त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कोणत्याही उपाययोजना नसल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे. अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संपूर्ण देशाच लक्ष आजच्या अर्थसंकल्पावर होतं. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. ज्याला आपण वेलफेअर स्टेटची संकल्पना मोडीत काढणारा अर्थसंकल्प म्हणू शकतो. आम्ही पण खूपदा अर्थसंकल्प सादर केले अर्थात देशाचा अर्थसंकल्प सादर करणं अन् एखादा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं वेगळं असं ते यावेळी म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Budget 2023: महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! आदिवासींसाठी विशेष कार्यक्रम हाती

तर पुढे बोलताना पवार म्हणाले की, अमृत कालचे व्यसन लावून मूळ प्रश्नांना बगल देणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही फार बारकाईने सर्व अर्थसंकल्प ऐकत होतो पाहत होतो. या अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या त्याजुन्याच घोषणा होत्या. त्या नव्याने पुनरुच्चार करण्यात आला आहे. तर सर्वात जास्त देशाला कर देणारे राज्य हे महाराष्ट्र आहे.

Ajit Pawar
Kasaba Peth Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला? 'हे' नाव आघाडीवर

त्याचबरोबर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या तिजोरीत आपल राज्य जास्त पैसा देतं त्याला थोड झुकत माप द्यायला हवं होतं. ते देण्यात आलेलं नाही तर 9 राज्यांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या राज्यांना थोडंसं अधिक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. देशाच्या अर्थसंकल्पात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकसारखा विचार केला पाहिजे. तर जिथं कमी आहे तिथं थोड जास्त दिलं तरी हरकत नाही परंतु असं झालेल नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com