NEET 2023 Sakal
देश

NEET 2023 : नीट परिक्षेत विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी; उघड्यावर कपडे बदलण्यासाठी जबरदस्ती

ब्रा मध्ये हात घातला, उघड्यावर जीन्स पँट काढून त्यांच्या आईची लेगीन घालायला सांगितली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नीट परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र तपासल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र, चंदीगढ आणि पश्चिम बंगाल येथील परिक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, रविवारी जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी नीटची परिक्षा दिली. परिक्षेवेळी महिला उमेदवारांची तपासणी करताना अंतर्वस्त्र तपासत उघड्यावर कपडे बदलण्यास भाग पाडले असून यासंदर्भातील अनुभव विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तरूणींच्या ब्रा मध्ये हात टाकून तपासणी करण्यात आली तर अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले गेल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील कस्तुरबा वालचंद कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीला कपडे काढून उलटे घालायला सांगितले अशी माहिती सदर विद्यार्थिनीच्या आईने सांगितली आहे.

जीन्स पँट काढून आईची लेगीन घालायला सांगितली

काही विद्यार्थिनींना उघड्यावर त्यांची जीन्स पँट काढून त्यांच्या आईची लेगीन घालायला सांगितली. कपडे बदलण्यासाठी कसलीच जागा नसल्याने विद्यार्थांच्या पालकांनी गोल केला आणि आतमध्ये तरूणींनी कपडे बदलले असा आरोप विद्यार्थिनींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे.

यासंदर्भात पालकांनी तक्रार केल्यानंतर एनटीएने सीसीटीव्ही फुटेज मागवले असून यासंबंधित तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही विद्यार्थिनींच्या कुर्तीवर काहीतरी लिहिलेलं आढळलं होतं म्हणून त्यांना उलटे कपडे घालण्यासं सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT