NEET PG 2021 
देश

NEET PG प्रवेश प्रक्रियेला १२ जानेवारीपासून सुरुवात; आरोग्य मंत्र्यांची घोषणा

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुरु होणार प्रवेश प्रक्रिया

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरात NEET PG प्रवेश प्रक्रियेला १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी याची घोषणा केली. मोठ्या कालावधीनंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्यानं आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. (NEET PG Counselling to start from 12 Jan Union Health Minister Mansukh Mandaviya)

मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "निवासी डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर MCC द्वारे NEET PG काऊन्सिलिंग (प्रवेश प्रक्रिया) १२ जानेवारी २०२२ पासून सुरु होत आहे. यामुळं कोरोनाशी लढा देण्यासाठी देशाला आणखी मजबुती मिळेल. सर्व उमेदवारांना माझ्या शुभेच्छा.

सात जानेवारी २०२२ रोजी सुप्रीम कोर्टानं NEET PG २०२१ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी परवानगी दिली होती. कोर्टाच्या अंतिम निर्णयानुसार, ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाला मंजुरी दिली होती. तर EWS साठी १० टक्के आरक्षण या वर्षापासून लागू करण्यालाही सहमती झाली होती. भविष्यात हा कोटा सुरु ठेवायचा की नाही याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप यायचा आहे. यासाठी पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे.

NEET PG 2021 ची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरु होणार होती. पण सुप्रीम कोर्टाद्वारे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यासंबंधी तरतुदींसंबंधी याचिकांवर सुनावणीवर स्थगिती आल्यानं याला उशीर झाला होता. यामुळं देशभरात ज्युनिअर आणि निवासी डॉक्टरांच्यावतीनं फेडरेशन ऑफ रिसिडन्ट डॉक्टर असोसिएशन (फोर्डा) बॅनरखाली ओपीडी सेवांवरही बहिष्कार टाकला होता. तर काही राज्यांमध्ये डॉक्टरांनी काळ्या पट्ट्या लावत निदर्शनं केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT