'...तर लॉकडाऊन लावणार नाही'; केजरीवालांचं दिल्लीकरांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal
"...तर लॉकडाऊन लादणार नाही"; केजरीवालांचं दिल्लीकरांना आवाहन

'गांभीर्याने मास्क वापरलात, तर लॉकडाऊन लावणार नाही'

नवी दिल्ली : देशात एकीकडे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग (Corona Infections) वाढत असताना विविध राज्यांनी निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत संसर्गाचा वेग सर्वाधिक आहे. पण तरीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीकरांना लॉकडाऊनबाबत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी एक महत्वाची अटही घातली आहे. जर दिल्लीकर गांभीर्यानं मास्क वापरणार असतील तर आम्ही लॉकडाऊन लादणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. (Wont impose lockdown if people continue to wear masks Delhi CM Arvind Kejriwal)

पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दिल्लीत तातडीने लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कुठलाही मानस नाही. आम्हाला लॉकडाऊन लादण्याची इच्छा नाही, पण जर आपण मास्क वापरला नाही तर लॉकडाऊन लावू"

दिल्लीत रविवारी २२,००० रुग्णांची होणार नोंद

दिल्लीत रविवारी २२,००० कोरोना रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. वाढती रुग्णसंख्या ही काळजी वाढवणारी आहे, पण घाबरण्याचं कारण कारण नाही. गेल्यावेळच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या डेटाचं विश्लेषण केल्यानंतरच मी हे सांगतो आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

केजरीवालांनी सांगितला स्वतःचा अनुभव

केजरीवाल हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यांनी स्वतःचा अनुभव सांगताना म्हटलं की, "मला कोरोना झाला होता, दोन दिवस मला ताप होता पण आता मी ठीक आहे. मी सात ते आठ दिवसांसाठी होम आयसोलेशनमध्ये राहिलो. पण दिल्लीत सध्या काय सुरु आहे याकडे माझं लक्ष होतं मी सतत फोनवरुन संबंधीत अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो"

गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेशी सध्याच्या लाटेचं आम्ही तुलना केली. यामध्ये सध्या कोरोनामुळं होणारे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याच प्रमाण खूपच कमी आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsdelhi news
loading image
go to top