देश

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

संतोष कानडे

नवी दिल्लीः आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याची घटना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झाली आहे. या प्रकरणा दिल्ली पोलिसांची एक टीम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. पोलिसांनी घटनेशी संबंधित संभाव्य पुरावे गोळा केले आहेत.

अतिरिक्त डीसीपी अंजिता चेप्याला, सिव्हील लाईन्स ठाण्याचे एसएचओ यांच्यासह दिल्ली पोलिसांची एक टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शनिवारी मुख्य आरोपी बिभव कुमार याला अटक केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जप्त केलं आहे. पोलिसांची टीम याचा तपास करणार असून साहित्य घेऊन पोलिस रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजप मुख्यालयातला मोर्चा आटोपून निवासस्थानी पोहोचले आहेत. तिकडे पोलिसांनी संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू केलं होतं. त्यामुळे आपच्या नेत्यांना मुख्यालयापर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. त्यामुळे नेते भाजप कार्यालयापासून अंतरावर बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT