Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदिर की मशिद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Atala Masjid: जौनपूरमधील मशिदीला मंदिर म्हणून घोषित करण्याचे प्रकरण न्यायालयात आले आहे. जौनपूरच्या प्रसिद्ध अटाला मशिदीला अटला माता मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.
Jaunpur Atala Masjid Claimed As Atala Mata Temple
Jaunpur Atala Masjid Claimed As Atala Mata Temple Esakal

जौनपूरमधील मशिदीला मंदिर म्हणून घोषित करण्याचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. जौनपूरच्या प्रसिद्ध अटाला मशिदीला अटला माता मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. ही मशिद 14 व्या शतकात बांधली गेली होती आणि ती इब्राहिम शाह शर्की यांनी बांधली होती. आता या प्रकरणाची सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. आग्राचे वकील अजय प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अटाला मशिदीच्या व्यवस्थापन समितीविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या अहवालात अटाला मशिदीच्या भिंतीवरील चित्रांमध्ये त्रिशूळ, फुले इत्यादींचा उल्लेख करण्यात आला आहे.

अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, अटाला मशिद हे मुळात अटाला माता मंदिर आहे. पुरातत्व विभाग आणि अनेक ऐतिहासिक स्त्रोतांनुसार, अटाला माता मंदिर कन्नौजचे राजा जयचंद्र राठोड यांनी बांधले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पहिल्या संचालकांनी आपल्या अहवालात लिहिले आहे की, अटल माता मंदिर पाडण्याचा आदेश फिरोजशहाने दिला होता, परंतु हिंदूंच्या संघर्षामुळे मंदिर पाडता आले नाही. पुढे इब्राहिम शहाने अतिक्रमण करून मंदिर मशिद म्हणून वापर करण्यास सुरुवात केली.

Jaunpur Atala Masjid Claimed As Atala Mata Temple
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

सनातन धर्म नष्ट करण्यासाठीच मुघल राज्यकर्त्यांनी हिंदू मंदिरे पाडली, असा युक्तिवाद मंदिराच्या वतीने करण्यात आला आहे. याच क्रमाने अटाला माता मंदिरही पाडण्यात आले आणि त्याचे नाव मशिद असे ठेवण्यात आले. मंदिराचे अवशेष आजही तेथे आहेत, असा दावा केला जात आहे.

सध्या ASI करते अटाला मशिदीचे संरक्षण

अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, अटाला माता मंदिर कन्नौजचे राजा जयचंद्र राठौर यांनी बांधले होते आणि इमारतीत त्रिशूळ आणि जास्वंदाची फुलेही सापडली होती. याशिवाय मशिदीवर कलशाचा आकार सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे. सध्या अटाला मशिद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहे.

Jaunpur Atala Masjid Claimed As Atala Mata Temple
Sharad Pawar: 'मी शरद पवारांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही...',अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं भाष्य म्हणाले, 'सुप्रिया अन् अजित यांच्यात...'

कलकत्ता स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य ईबी हॅवेल यांनी त्यांच्या पुस्तकात अटाला मशिदीचे स्वरूप आणि चरित्र हिंदू म्हणून वर्णन केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अनेक अहवालांमध्ये अटाला मशिदीची छायाचित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये त्रिशूळ, जास्वंदीची फुले आदी आढळून आले आहेत. 1865 च्या एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या जनरलमध्ये अटाला मशिदीच्या इमारतीवर कलश आकृत्यांच्या उपस्थितीचा उल्लेख आहे.

फतेहपूर सिक्रीच्या दर्ग्याबाबतही करण्यात आला होता दावा

याआधी अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी दावा केला होता की, फतेहपूर सीकरीच्या दर्ग्यामध्ये माता कामाख्या देवीचे मंदिर आहे. याबाबत त्यांनी आग्रा जिल्हा न्यायालयात दावाही दाखल केला होता. माता कामाख्या देवीचा मूळ गर्भ फतेहपूर सिक्री येथील सलीम चिश्ती दर्ग्यात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सलीम शेख चिश्ती दर्ग्याला माता कामाख्याचे मंदिर घोषित करावे, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे.

Jaunpur Atala Masjid Claimed As Atala Mata Temple
Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com