Raghunath Jadhav Sucide case sakal
देश

Crime News: आई-बाबा माफ करा! सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या

मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आत्महत्या

रुपेश नामदास

Madhya Pradesh: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात एका कनिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. आकांक्षा माहेश्वरी असे या डॉक्टरचे नाव आहे. ती बालरोग विभागात पीजी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

आकांक्षाच्या या निर्णयाने कॉलेज प्रशासनालाही धक्का बसला आहे. महिला डॉक्टरने स्वत:ला वसतिगृहातील एका खोलीत कोंडून घेत स्वत:लाच एकामागून एक इंजेक्शन दिले. इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोटही मिळाली आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'इतका ताण सहन करण्याइतकी माझी ताकद नाही. माफ करा आई आणि बाबा. मित्रांनो माफ करा. वैयक्तिक कारणामुळे मी आत्महत्या करत आहे" झोपीची औषधे आणि पेन किलर इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सुसाईड नोटमध्ये ती कमकुवत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आकांक्षा माहेश्वरीने स्वतःला 6 इंजेक्शन्स दिली होती. ओव्हरडोजमुळे तिचा मृत्यू झाला आहे. महिला डॉक्टरवर कामाचा खूप ताण होता, त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT