Uddhav Thackeray: शिंदेंनी कवाडेंना सोबत घेऊनही ठाकरेंचच पारडं जड; जाणून घ्या कसं

भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची युती
Bhima Shakti Shiva Shakti
Bhima Shakti Shiva Shaktiesakal

शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि वंचित एकत्र आले. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्या बाबत प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन विकास अघाडी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar alliance)

Bhima Shakti Shiva Shakti
Yogi Adityanath : CM योगींच्या भगव्या कपड्यांवर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान; म्हणाले, आता थोडं मॉर्डन..

तर शिवसेना सोडेल तेवढ्या जागा लढण्याची तयारी वंचितने दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत मोठा फायदा होवू शकतो. मात्र जातीय समीकरण पाहता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या RPI कवाडे गटाला गळाला लावलं आहे. आज शिंदे गट आणि RPI कवाडे गट यांनी युतीची घोषणा केली आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील महानगरपालिका निवडणुकीच्या दुष्टीकोनातून पाऊल टाकले आहे. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भिम शक्तीची साथ कोणाला आणि कितपत मिळू शकते हे सांगता येवू शकत नाही. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला नुसार जातीय समीकराचा फायदा शिवसेनाला नक्कीच होवू शकतो.

२०१९च्या विधान सभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि MIM सोबत युती करून विधानसभा लढवली होती त्यावेळी मुंबईमधील प्रमुख मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार तिसऱ्या नंबरची मतं घेतली होती.

तर कवाडे गटाची कोठोही वाच्चता नव्हती त्यामुळे जरी कवाडे गटाने शिंदे गटासोबत युती केली असली तरी महानगर पालिकेच्या निवडणुकात फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे जातीय गणित पाहत शिवसेने ठाकरे गटाला महानगर पालिकेच्या निवडणुकीत चांगला फायदा होवू शकतो का हे पाहवं लागणार आहे.

विशेष म्हणजे पूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिव शक्ती-भीम शक्तीचा प्रयोग केला होता, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील हाच प्रयोग करू पाहत आहेत.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

विधानसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये वंचितला मिळालेली मतांची टक्केवारी.

विधानसभा 2019 च्या निवडणुकीची टक्केवारी

कुलाबा मतदारसंघ

भाजपा- 83.85%

काँग्रेस 38.66%

वंचित 2.82%

मुंबादेवी विधानसभा

काँग्रेस 54.87%

शिवसेना 32.85

एम आय एम 5.93%

वंचित 1.18%

वरळी विधानसभा

शिवसेना 69.14%

राष्ट्रवादी 16.91%

वंचित 5.9%

सायन कोळीवाडा विधानसभा

भाजप 42.24%

काँग्रेस 31.49%

वंचित 8.9%

मनसे 10.54%

वांद्रे पश्चिम विधानसभा

भाजप 57.11%

काँग्रेस 36.88%

वंचित 2.53%

वांद्रे पूर्व विधानसभा

काँग्रेस 30.28%

शिवसेना 25.71%

वंचित 2.3%

मनसे 8.44%

कलिना विधानसभा

शिवसेना 36.53%

काँग्रेस 32.37%

मनसे 18. 89%

वंचित 2.51%

चेंबूर विधानसभा

शिवसेना 40.15 टक्के

काँग्रेस 25.2%

वंचित 17.47%

मनसे 10.86%

मानखुर्द विधानसभा

समाजवादी 48.18%

शिवसेना 30.32%

वंचित 7.3 टक्के

घाटकोपर पुर्व विधानसभा

भाजप 57.7%

मनसे 15.59%

काँग्रेस 12.44%

वंचित ८.२७ टक्के

चांदिवली विधानसभा

शिवसेना 43.74%

काँग्रेस 43.53%

वंचित 4.52%

मनसे 3.62%

विलेपार्ले विधानसभा

भाजप 61.3%

काँग्रेस 19.7%

मनसे 13.22%

वंचित 2.78%

अंधेरी पूर्व विधानसभा

शिवसेना 42.67%

काँग्रेस 19%

वंचित 2.93%

वर्सोवा विधानसभा

भाजप 33.98%

काँग्रेस 29.69%

मनसे 4.17%

वंचित 2.13%

गोरेगाव विधानसभा

भाजप 53.34%

काँग्रेस 21.23%

मनसे 17.52%

वंचित 3.52%

चारकोप विधानसभा

भाजप 71.1%

काँग्रेस 22.64%

वंचित 1.66%

कांदिवली पूर्व विधानसभा

भाजप 63.22%

काँग्रेस 24.35%

मनसे 7.52%

वंचित 1.87%

दिंडोशी विधानसभा

शिवसेना 52.61%

राष्ट्रवादी 24.13%

मनसे 16.55%

वंचित 2.13%

जोगेश्वरी पूर्व

शिवसेना 60.86%

काँग्रेस 21.39%

वंचित 3.41%

भांडुप पश्चिम विधानसभा

शिवसेना 45.70%

मनसे 26.86%

काँग्रेस 19.29%

वंचित 4.71%

विक्रोळी विधानसभा

शिवसेना 49.8%

राष्ट्रवादी 27.32%

मनसे 12.54%

वंचित ७.१५ टक्के

मुलुंड विधानसभा

भाजप 56.46%

मनसे 19.35%

काँग्रेस 15.44%

वंचित 3.8%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com