Nitin Gadkari sakal media
देश

...म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढताहेत; गडकरींनी सांगितलं कारण

मागच्या पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत. त्यावरून विरोधकांकडून सरकावर टीका होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी या विषयाबद्दल प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या परिस्थिती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. 'एबीपी नेटवर्क'च्या 'आयडियाज ऑफ इंडिया' परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केलीय. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

SIR ला हलक्यात घेऊ नका... तुमचं नाव मतदार यादीतून कट होणार? नंतर काय कराल? सोप्या भाषेत माहिती

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर; सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली उपचार

Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

SCROLL FOR NEXT