योगी 2.0 सरकारमध्ये तरुणांना मोठी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi government

योगी 2.0 सरकारमध्ये तरुणांना मोठी संधी

योगी सरकारमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलीय. मख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वय ४९ वर्ष आहे. सर्वात तरुणमंत्री संदीपसिंह हे ३० वर्षांचे आहेत, तर सगळ्यात ज्येष्ठ मंत्र्याच वय ७३ वर्ष आहे. २६ वर्षीय कुशाग्र सिंह हे सर्वात तरूण आमदार ठरलेत. योगी सरकारचं सरासरी वय ५३ वर्ष आहे. (Yogi have given opportunity to youth in his 2.0 government).

हेही वाचा: हिजाब प्रकरणाचे विरारमध्ये पडसाद; मुस्लिम प्राध्यापिकेच्या राजीनाम्याने खळबळ

कल्याणसिंह यांचे नातू सर्वात तरूण मंत्री:

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे नातू आणि मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले संदिपसिंह योगी सरकारमधील सर्वाधिक तरुण मंत्री ठरले आहेत. अलीगढ येथील 'अतरौली' विधातसेच नसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. १८ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपलं वय ३० वर्ष लिहीलय, २०१७ मध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपले वय २६ वर्ष दाखवलं होतं. त्यामुळे पाच वर्षात संदीपसिंह यांचं वय केवळ ४ वर्षांनीच वाढलं का, असा प्रश्न पडतो. योगी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे शिक्षण व वित्त राज्यमंत्रीपद होते. त्यांचे आजोबा फायरब्रॅंड नेता कल्याणसिंह याच मतदारसंघातून तब्बल दहा वेळा निवडुन आले होते. ते दोन वेळा उत्तरपदेशचे मख्यमंत्री होते.

हेही वाचा: क्रिकेटसाठी 'ती' सगळ्यांशी नडली; आज आहे देशाची 'शान'

दानिश आजाद आन्सारी हे एकमेव मूस्लिम मंत्री :

दानिश आजाद अन्सारी हे योगी सरकारमधील एकमेव मुस्लीम मंत्री असून त्यांचं वय ३२ वर्ष आहे. आश्चर्य म्हणजे दानिश आजाद यांनी निवडणूकही लढविली नाही. २०११ पासून दानिश आजाद अन्सारी हे आखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी एमबीए तसेच क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये देखील मास्टर पूर्ण केलं. २०१८ मध्ये दानिश आजाद यांची उर्दू भाषा समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. हे पद कॅबिनेट दर्जाचे होते. आता मात्र निवडणूक न लढविता देखील दानिश आजाद अंन्सारी यांची कॅबिनेटपदी वर्णी लागलीय.

सतीश शर्मा या आमदाराचं वय ३९ वर्ष असून दरियाबाद विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली.नितिन अग्रवाल यांच वयही ३९ वर्ष आहे. हरदोई विधानसभा मतदार संघातून अग्रवाल निवडुन आलेत. योगी सरकारमधील मंत्र्याचे वय- ५१ ते ६० वर्ष वयोगटाचे -२० मंत्री आहेत. तर ६१ ते ७० वयोगटाचे ११ मंत्री आहेत. ४० ते ५० वयोगटातील १६ मंत्री आहेत. तर ३० ते ४० वयोगटात ४ मंत्री आहेत.

Web Title: Yogi 20 Government Have Young Ministers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top