Rahul Gandhi  Team eSakal
देश

पंतप्रधानांच्या संसदेतील अनुपस्थितीवरुन राहुल गांधींचा निशाणा

Parliament Winter Session 2021: पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत सोबत दिसून आले.

सुधीर काकडे

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) २९ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाची सुरूवातच मोठ्या गदारोळाने झाली असून, राज्यसभेतील (Rajya Sabha) १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलंय. त्यावरून विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. आज याच गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं . या दरम्यान आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधीपक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लोकभेच्या परिसरात आंदोलन केलं.

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला. तसेच काही वेळापूर्वी एक ट्विट करत त्यांनी लोकसभेत चर्चा आणि विरोध यांचं महत्व या विषयावर शिकवणी घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. ज्या मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं ते बोलू दिलं जात नाही, संसदेत चर्चा झाली पाहिजे. आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे आहेत, मात्र ते विचारू दिले जात नाही असे गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी हे सोबत दिसून आले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

विरोधकांनी केलेल्या निदर्शनादरम्यान संजय राऊत म्हणाले की, जवळपास २ आठवड्यांपासून संघर्ष सुरु आहे. सकाळी आम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा आम्ही फक्त लोकशाही वाचवा आणि न्याय द्या अशी विनंती केली. तेव्हा आम्ही त्यांनाही म्हटला की आम्हालाही निलंबित करा. आम्ही शेवटपर्यंत लढू, आम्ही झूकणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

Latest Marathi News Update : ‘मन की बात’ ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती, गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा

Nana Patole Statement : २०२४ साली काँग्रेसचे ७५ तर महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडूण आले असते; आयबीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख, नाना पटोलेंचा दावा

SCROLL FOR NEXT