PM Narendra Modi releases the 21st installment of the PM Kisan Samman Nidhi Yojana, providing financial support to millions of Indian farmers.

 

esakal

देश

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

PM Modi Release Kisan Samman Nidhi : देशभरातील जवळपास नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाली रक्कम

Mayur Ratnaparkhe

PM Kisan 21st Installment Released by PM Modi : पंतप्रधान मोदींनी आज(बुधवार) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता केला जारी केला आहे. यामुळे देशभरातील जवळपास नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. या योजनेच्या २१ व्या हप्त्यामधून सरकारने जवळपास १८ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तर रक्कम जारी केली आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपये हस्तांतरित करते. जे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण ३ लाख ९० हजार कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारची ही प्रमुख योजना २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. हा निधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण फायदा असल्याचे सिद्ध झाले आहे. तर पीएम-किसानचे फायदे फक्त त्याच शेतकऱ्यांनाच मिळत आहेत, ज्यांच्या जमिनींची माहिती पीएम-किसान पोर्टलवर नोंदणीकृत आहे आणि ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे.

सरकार वेळोवेळी गावपातळीवर विशेष मोहिमा राबवत आहे जेणेकरून शेतीयोग्य जमीन असलेल्या परंतु अद्याप या योजनेत समाविष्ट न झालेल्या सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट केले जाऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT