Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Latest update on Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार २० नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता गांधी मैदानावर दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
Nitish Kumar announces a new Bihar Cabinet including two Deputy Chief Ministers and 20 Ministers.

Nitish Kumar announces a new Bihar Cabinet including two Deputy Chief Ministers and 20 Ministers.

esakal
Updated on

Overview of Nitish Kumar’s New Cabinet Structure बिहारमध्ये सध्या नवीन सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींन वेग आला आहे. नितीश कुमार यांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपकडूनही मंत्रिमंडळात नेमकी कोणाला संधी द्यायची याची नावे जवळपास निश्चत केली गेली आहे.

प्राप्त माहितीनुसार उद्या (बुधवार) अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडतील. आधी, भाजप आणि जेडीयू विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका होतील. त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, जिथे नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पुन्हा निवड केली जाईल. 

नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुख्यमंत्री नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात जातील. नितीश कुमार २० नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता गांधी मैदानावर दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पाटणा येथे पोहोचतील.

Nitish Kumar announces a new Bihar Cabinet including two Deputy Chief Ministers and 20 Ministers.
Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

गृहमंत्री अमित शाह बुधवारी पाटणा येथे पोहोचतील. भाजपने सर्व एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांना आमंत्रित केले आहे.

Nitish Kumar announces a new Bihar Cabinet including two Deputy Chief Ministers and 20 Ministers.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन उपमुख्यमंत्री आणि सुमारे २० मंत्र्यांसह शपथ घेतील. यामध्ये भाजप, जेडीयू, एलजेपी (आर), हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) चे आमदार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com