PM Modi Praised Sharad Pawar  sakal media
देश

शरदरावांकडून शिका, PM मोदींकडून संसदेत पवारांची स्तुती

'तुम्हाला कोणाकडून शिकायचे नसेल तर शरदरावांकडून (Sharad Pawar) शिका', असा सल्ला काँग्रेसला (Congress) देत त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) तोंडभरून स्तुती केली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज संसदेत बोलताना पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेतृत्व निराशेत आहेत. त्यांच्या निराशेचा परिणाम इतरांवर होतो. तुम्हाला कोणाकडून शिकायचे नसेल तर शरदरावांकडून शिका, असा सल्ला काँग्रेसला देत त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) तोंडभरून स्तुती केली.

सार्वजनिक आयुष्यात उतार-चढाव येत असतात. जय-पराजय होत असतो. त्या आयुष्यातून आलेली निराशा देशावर लादू नका. जेव्हा शेतात हिरवळ असते तेव्हा डोळ्यांनी दिसणं बंद झालं तर ते हिरवळ आयुष्यभर त्याला दिसतेय. त्यानुसार २०१३ मध्ये देशाची दुर्दशा झाली होती. २०१४ मध्ये सत्ता गेल्यानं विरोधकांच्या डोळ्यात काजवे चमकले. त्यामुळे काही लोकांची दृष्टी गेली आहे. त्यामुळे त्यांना २०१३मधील निराशा दिसतेय, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. (

पवारांची स्तुती (PM Modi Praised Sharad Pawar) -

प्रत्येक नेता आपल्या क्षेत्रात मोठा असतो. सत्तेत असलेला व्यक्ती नेता आणि विरोधात बसलेली व्यक्ती नेता नाही, असं नसतं. नेतृत्वामध्ये जर निराशा असेल तर देशाचं काय होईल? विरोधात बसल्यानंतर देशाच्या हिताचा विचार करता येत नाही का? कोणाकडून शिकायचं नसेल तर शरदरावांकडून शिका. या वयात देखील अनेक आजार झाले असून ते अनेकांना प्रेरणा देतात. तुम्ही निराश झाल्यानंतर त्याचा परीणाम दुसऱ्यावर होतो, असं मोदी म्हणाले.

मोदींनी काँग्रेसला सल्ला दिल्यानंतर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान काय बोलत आहेत? असं ते म्हणाले. त्यानंतर तुम्ही सन्मानीय नेते आहात? तुम्हाला हे बोलणं शोभत नाही. त्यासाठी दुसरे नेते आहेत, असं म्हणत मोदींना खरगेंना गप्प बसवलं. त्यानंतर परत शरद पवारांची स्तुती केली. कोरोना काळात घेतलेल्या बैठकांवर काँग्रेसने बहिष्कार घातला, पण शरद पवारांनी साथ दिली, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT