PM Modi thanks people, ‘including Congress members’, for support ahead of his US visit  
देश

US दौऱ्यापूर्वी PM नरेंद्र मोदींचे ट्विट, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ४ दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ४ दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. जे सध्या चर्चेत आले आहे. (PM Modi thanks people, ‘including Congress members’, for support ahead of his US visit)

काँग्रेसचे सदस्य, विचारवंत नेते आणि इतरांसह सर्व स्तरातील लोक माझ्या आगामी यूएसए भेटीबद्दल त्यांचा उत्साह शेअर करत आहेत. त्यांच्या दयाळू शब्दांसाठी मी त्यांचे आभार मानतो. असे वैविध्यपूर्ण समर्थन भारत-अमेरिका संबंधांची गहनता अधोरेखित करते. असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असून त्यानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार आहेत. ४ दिवसांच्या अमेरिका भेटीदरम्यान प्रधानमंत्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उप राष्ट्राध्यक्ष कमल हारिस तसंच परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहेत.

या दौऱ्यावर असताना मोदी यांचा व्हाइट हाऊसमध्ये राजकीय सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी डीनर देखील करणार आहेत.गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात मोदी यांचा हा ७ वा अमेरिका दौरा आहे. चीनचा वाढत असलेला प्रभाव, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

असा असेल PM मोदींचा संपूर्ण दौरा

21 जूनला मोदींच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी नूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र हॅडकोर्टर मध्ये योगा दिवस साजरा करून होणार आहे. यावेळी मोदी काही मोठ्या नेत्यांशीही यावेळी संवाद साधतील. 21 जूनला वॉशिंग्टन डीसीमध्ये स्केलिंग फॉर फ्यूचरवर आधारित कार्यक्रमात सहभागी होतील. याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खासगी बैठक होण्याचीही शक्यता आहे.

22 जूनला व्हाईट हाऊस मध्ये मोदींच स्वागत केलं जाईल. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधित्व स्तरावर द्विपक्षीय बैठक होईल. त्यानंतर मोदी हे US काँग्रेसला संबोधित करतील. त्यानंतर रात्री बायडन यांनी मोदींसाठी जेवणाच्या कार्यक्रमाच आयोजन केल आहे. 23 जूनला मोदी काही कंपन्यांच्या CEO सोबत चर्चा करतील. त्यानंतर कैनेडी सेंटर मधील एका कार्यक्रमात मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT