Narendra Modi esakal
देश

Narendra Modi : लोकसभा अध्यक्षांसह पंतप्रधान मोदींनी केली विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेचं सत्र संपताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

संतोष कानडे

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेचं सत्र संपताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी,अर्जुन राम मेघवाल यांची उपस्थिती होती. विरोधी पक्षाचे नेते बीजेडीचे भरतरी मेहताब आणि बीएसपीचे दोन खासदार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर जे काही निर्णय घ्यायचे आहेत, ते घ्यावे लागतील. कर्नाटक विधानसभेत एक व्यक्ती आमदार नसतानाही खूप वेळेपर्यंत सभागृहात बसून होता. या मुद्द्यासंदर्भातही सभागृहात विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना बोललं पाहिजे.

दरम्यान, गुरुवारी लोकसभेतून तीन खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये नकूल नाथ, डीके सुरेश, दीपक बैज यांचा सहभाग आहे. संसदेच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे सभागृहात गोंधळ झाल्यानंतर खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरु झालं.

सुरुवातीला १४ डिसेंबरला लोकसबेचे १३ आणि राज्यसभेच्या एका खासादाराचं निलंबन झालं होतं. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ खासादारांचं निलंबन करण्यात आलं. पुढे १९ डिसेंबर रोजी ४९ खासदार निलंबित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT