abdul kalam 
देश

कलाम जिहादी, अणुबॉम्बची माहिती पाकला दिली होती; पुजाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील डासना देवी मंदिराच्या पुजाऱ्याने धक्कादायक वक्तव्य केलंय. नरसिंहानंद सरस्वती यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशातील सन्माननीय कुटुंबातील कोणताही मुस्लिम हा कधीच देशभक्त असू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नरसिंहानंद यांनी कलाम यांना जिहादी ठरवून टाकलंय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे नरसिंहानंद सरस्वती पुजारी आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

अब्दुल कलाम हे डीआरडीओ प्रमुख होते, त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीसंदर्भातील माहिती दिल्याचा धक्कादायक आरोप पुजाऱ्याने केला आहे. कलाम यांनी मुस्लिमांसाठी एक विशेष विभाग तयार केला होता. राष्ट्रपती भवनमध्ये हा विशेष विभाग होता. याठिकाणी कोणताही मुस्लिम व्यक्ती आपली तक्रार घेऊन जाऊ शकत होता, असा दावाही नरसिंहानंद सरस्वती यांनी केलाय. नरसिंहानंद यांनी कोणताही पुरावा न देताच असा धक्कादायक आरोप केला आहे. 

भारतीयांसाठी अब्दुल कलाम हे एक प्रिय राष्ट्रपती होते. त्यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. अणु चाचणीसंदर्भात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती. कलाम लहान मुलांमध्येही प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी दिलेली भाषणं ऐकून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्यासाठी त्यांना सरकारने भारतरत्न देऊन गौरव केला आहे. कलामांनी आपल्या बोलण्यातून अनेकदा भारताबाबत प्रेम व्यक्त केले आहे. अशा आदरणीय व्यक्तीबद्दल नरसिंहानंद सरस्वती या पुजाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय.

गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी मंदिरात जाऊन पाणी प्यायल्याने एका मुस्लिम मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती.  नरसिंहानंद सरस्वती याच मंदिराचे पुजारी आहेत. त्यामुळे गाझीयाबादमधील हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी राष्ट्रपती कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. त्यांना साधेपणा अनेकांना भावला. डासना देवी मंदिराच्या पुजाऱ्याने कोणतेही पुरावे सादर न करता त्यांच्यावर धक्कादायक आरोप केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT