Corona Hospital Bed sakal media
देश

सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयं चांगली - नीती आयोग

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : सरकारी रुग्णालयांपेक्षा रुग्णसेवा आणि अन्य बाबतीत‌ खासगी रुग्णालये सरस असतात, हे सामान्य माणसाला ज्ञात असतेच. पण कोणतेच सरकार हे जाहीरपणे मान्य करीत नाही. मात्र आता नीती आयोगानेच कबुली देत सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालये रुग्णसेवा आणि पायाभूत‌ सुविधांमध्ये सरस असून, रुग्णांना समाधानकारक‌ सेवा तिथे मिळत‌ असल्याचे म्हटले आहे.

नीती आयोगान 'भारतातील दुय्यम, तृतीय स्तरावरील आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमधील आपत्कालीन सेवांची सद्यस्थिती आणि रुग्णसेवा' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि रुग्ण संख्या तसेच रुग्णवाहिका सेवा, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि इमर्जन्सी केअरच्या गरजेनुसार उपकरणांची सध्याची कमतरता यांचा उहापोह यात आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आणि नीती आयोगाच्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालात 34 जिल्हा रुग्णालयांव्यतिरिक्त देशातील 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील 100 आपत्कालीन आणि अपघाती रुग्णसेवा केंद्रांच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन केले.

अहवालाच्या प्रस्तावनेत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी देशात जागतिक दर्जाची, कार्यक्षम, व्यावसायिक, एकात्मिक आपत्कालीन काळजी वा रुग्णसेवा प्रणाली तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन किंवा अपघातामुळे पीडित लोकांची काळजी घेण्यास सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, यांनी अशी आरोग्य व्यवस्था तयार करण्याच्या गरजेवर भर दिला, की जिथे कोरोनरी सिंड्रोम, स्ट्रोक, श्वसन रोग, माता आणि बालरोग आपत्कालीन परिस्थिती आणि अपघाती रुग्णांची काळजी घेतली जाऊ शकते. कारण याच गोष्टी मृत्यूचे आणि भारतातील अपंगत्व येण्याची ही प्रमुख कारणे आहेत.

रुग्णवाहिका सेवा, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, उपकरणांची स्थिती, आवश्यक औषधे, सेवेची हमी, यांसह आपत्कालीन विभागातील कमतरता आणि खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमधील‌ दर्जात्मक अंतरांचे तपशीलवार विश्लेषण सादर केले आहे. भारतातील आरोग्य सुविधांच्या सर्व स्तरांवर तसेच आपत्कालीन सेवा सुधारण्यासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरू शकेल. आरोग्यासंबंधी देशव्यापी धोरण कसे असावे, रुग्णसेवेसाठी प्रमाणित प्रोटोकॉल, पुरेसे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ, जागतिक दर्जाच्या रुग्णवाहिका सेवा आणि रक्तपेढ्यांचा विस्तार यांची गरजही अहवालात अधोरेखित करण्यात‌ आली आहे.

आपत्कालीन रुग्णसेवा सेवा, डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, सेवेसंबंधी नियमित तपासणी आदी बाबतीत खाजगी रुग्णालये सरकारी रुग्णालयांपेक्षा चांगली कामगिरी करतात. खाजगी रुग्णालये संवाद कौशल्य आणि वेळेवर सेवा प्रदान करण्यातही सरस असल्याने रुग्णांना समाधानी राखण्यात ही रुग्णालये पुढे असतात, असे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी अनेक शिफारशी देखील करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT