
जगभरत गेल्या काही दिवसांपासून हॅकींगचं (Hacking) प्रमाण वाढलं आहे. आजवर अनेक मोठ्या कलाकार, राजकारणी आणि उद्योगपतींचे अकाऊंट हॅक झाले असून, त्यामुळे सायबर सुरक्षेवर (Cyber Security) वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अशातच काल रात्री काही वेळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अकाऊंट हॅक (PM Modi Twitter Account Hacked) झालं होतं. त्यानंतर पुन्हा सायबर सुरक्षेचे वाभाडे काढले जात आहेत. तर दुसरीकडे मिमकऱ्यांनी देखील या संधीचा फायदा घेतल्याचं दिसतंय.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अकाऊंट हॅक झालं आणि मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी बीटकॉईन संबंधित एक फसवं ट्विट करण्यात आलं आहे. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं या ट्विटमधून म्हटलं आहे. सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाईल,असं हे ट्विट होतं.
पंतप्रधानांचं अकाऊंट हॅक होत असेल, तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न मिमकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी फक्त चेष्टा करण्यासाठी मिम बनवले आहेत.
दुसरीकडे यावेळी टीकाकारांनी देखील ही संधी सोडली नाही. पंतप्रधान मोदी स्वत:च प्रमोशन करण्यासाठी खटाटोप करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, दोन मिनिटात हे ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यानंतर २.१४ वाजता आणखी पहिल्या ट्विटसारखंच दुसरं ट्विट करण्यात आलं. त्यानंतर हे ट्विट देखील डिलिट झाले.
यासंबंधी पीएमओ कार्यालयाने एक ट्विट करून काही वेळासाठी मोदींचं अकाउंट हॅक झालं होतं. या वेळेत मोदींच्या अकाउंटवरून कुठलंही ट्विट केलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, असं पीएमओने म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.