Green Expressway 
देश

Green Expressway: पुणे-छत्रपती संभाजीनगर ‘ग्रीन एक्स्प्रेस वे होणार; नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बीओटी तत्त्वावर बांधला जाणार आहे. या मार्गामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Green Expressway: नवी दिल्ली: पुणे-चाकण-शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या संदर्भात शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, पुणे-चाकण या औद्योगिक परिसरात वाहतुकीची घनता अधिक आहे. यामुळे चाकण-तळेगाव ते शिंगणापूर पर्यंत एक उन्नत (एलिवेटेड) मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बीओटी तत्त्वावर बांधला जाणार आहे. या मार्गामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा लवकरच

मुंबई मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याचे काम पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. या संदर्भात शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी प्रश्न विचारला होता. सध्या देशात ९०६ किलोमीटर लांबीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे. हा विस्तार आणखी ९६० किलोमीटरपर्यंत करावयाचा आहे. येत्या तीन वर्षात हे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे. मुंबईच्या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

बिल्डींग प्लान ऑनलाइन-

मुंबईत महापालिकेत ऑनलाइन पद्धतीने इमारत बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याची यंत्रणा सुरू करण्यासाठी राज्य सरकारला सूचना देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. या संदर्भात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी प्रश्न विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT