Rahul Gandhi compared BJP-RSS to Traitor Rahul Gandhi compared BJP-RSS to Traitor
देश

राहुल गांधींनी भाजप-आरएसएसची तुलना केली देशद्रोहींशी; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाला द्वेषाच्या आगीत टाकून हात शेकणाऱ्या भाजप (BJP) आणि आरएसएसचा (RSS) इतिहास सर्वांना माहीत आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. राजस्थानातील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती येथे नूपुर शर्माच्या समर्थनात पोस्ट केल्याने दोघांची हत्या करण्यात आली. यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शनिवारी (ता. २) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. उदयपूर व अमरावती येथील दोघांच्या हत्येनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. अमरावती येथील केमिस्ट दुकान मालक उमेश कोल्हे यांची हत्या उदयपूरच्या कन्हैयालालच्या हत्येच्या घटनेपूर्वी म्हणजे २१ जून रोजी घडली होती.

परंतु, अमरावतीची घटना उदयपूरच्या घटनेसारखीच असल्याचे आता तपासातून समोर आले आहे. येथेही हल्लेखोरांनी उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून केला होता. नूपुर शर्माच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे.

याप्रकरणी आता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. ‘खोटा प्रचार आणि खोटेपणा हा भाजप आणि आरएसएसचा (RSS) पाया आहे. द्वेषाच्या आगीत देशाला टाकणाऱ्या भाजप-आरएसएसचा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे.

या देशद्रोहींनी (Traitor) कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी, काँग्रेस त्यांच्यापेक्षा जास्त जोडण्याचा प्रयत्न करेल. भारताला एकसंध करण्यासाठी काम करीत राहू, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

आजचे राशिभविष्य - 21 ऑक्टोबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑक्टोबर 2026

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

SCROLL FOR NEXT