Rahul Gandhi News sakal
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींना पासपोर्ट मिळणार, दिल्ली न्यायालयाचा मोठा दिलासा!

Sandip Kapde

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली होती. दरम्यान या याचिकेला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली.

राहुल गांधी नवीन पासपोर्टसाठी एनओसीची गरज होती. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होची यावर आज सुनावणी झाली.

राहुल गांधी यांनी दहा वर्षासाठी एनओसीचा कालावधी वाढवून मागितला होता. मात्र न्यायालयाने राहुल गांधी यांना ३ वर्षासाठी एनओसी वैध असल्याचे म्हटले आहे.

वकिलांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की जर त्याला एनओसीची मुदत वाढवायची असेल तर त्याला तीन वर्षांनी पुन्हा न्यायालयात यावे लागेल.

गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. हे प्रकरण 'मोदी आडनाव' संबंधित होते. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला. आता त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी अर्ज केला होता. ज्यासाठी त्यांना एनओसी गरज होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT