Maharashtra Politics: कोण संजय राऊत? फडणवीसांनी उपस्थित केला उलट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics Devendra Fadnavis

Maharashtra Politics: कोण संजय राऊत? फडणवीसांनी उपस्थित केला उलट सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांनी संजय राऊत यांच्या विधानासंदर्भात विचारलं असता फडणवीस यांनी कोण संजय राऊत? असा सवाल उपस्थित केला. (Maharashtra Politics Devendra Fadnavis on sanjay raut cabinet expansion Cm Eknath Shinde)

संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे नेते आहेत. अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. (Marathi Tajya Batmya)

काय म्हणाले फडणवीस?

आज अहमदनगर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे प्रसार माध्यमांची बोलत असताना संजय राऊत यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. त्यामुळे संजय राऊत यांच्या बद्दल त्यांनी बोलणे टाळले.

महाविकास आघाडीमध्ये काही झाले तरी त्याचा आरोप भाजप वर होत असतो. भाजप सर्व काही करत असल्याचे बोलले जात असताना पुढील काळात मुलगा झाला तर आमचं नाव घेऊ नका असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.

विस्तारासंदर्भात बोलताना काय म्हणाले फडणवीस?

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असं खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. याबाबत विचारणा केली असता, आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.