Kedarnath Temple Esakal
देश

Rain Alert : केदारनाथमध्ये भूस्खलनाने 2 लहान मुलांचा मृत्यू; उत्तराखंडात अलर्ट

Rain Alert in Uttarakhand kedarnath : उत्तराखंडमध्ये पावसाने जोर वाढवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना समोर येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Rain Alert in Uttarakhand kedarnath

देहरादून : उत्तराखंडमध्ये पावसाने जोर वाढवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना समोर येत आहेत. केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये जमीन खचल्याची घटना घडली असून तीन लहान मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय तर एक मुलगी जखमी झालीय. पावासाच्या जोरदार बॅटिंगमुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

जमीन खचल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गौरिकुंड गावात नेपाळी वंशाची तीन मुले जमीन खचल्याने ढिगाऱ्याखाली अडकली. त्यात एक आठ वर्षाची मुलगी स्विटी, पाच वर्षाची मुलगी पिंकी आणि एक लहान मुलगा यांचा समावेश होता.

तिन्ही मुलांना स्थानिक पोलिस, एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना गौरीकुंड रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. स्विटीची प्रकृती ठीक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. जिल्हा आपत्कालीन अधिकारी नंदन सिंह म्हणाले की, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय, तर एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलंय.

उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस

उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सुचित करण्यात आलंय की त्यांनी खबरदारी घ्यावी, तसेच हवामान विभागाची अपडेट घ्यावी. तसेच भाविकांना जास्त काळ न भटकण्याचा सल्ला देण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT