Rajsthan Election esakal
देश

Rajastan Election: सत्तास्थापनेसाठी ‘फिल्डिंग’ ; गेहलोत अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात?

Ashok Gehlot : काही सर्वेक्षणांनुसार काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याला आतापासूनच सुरुवात केल्याचे समजते.

सकाळ डिजिटल टीम

Rajastan Election: राजस्थानमध्ये सत्तेत बदल होण्याची प्रथा असली तरी यावेळी काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. परंतु काही सर्वेक्षणांनुसार काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याला आतापासूनच सुरुवात केल्याचे समजते.

राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ मतदारसंघांमध्ये गेल्या २५ नोव्हेंबरला मतदान पार पडले. सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी किमान १०० आमदारांचे समर्थन हवे आहे. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने अपक्ष निवडून आलेल्या आमदारांच्या मतावर पूर्ण मदार राहणार आहे.

गेल्या निवडणुकीत राजस्थानमध्ये १३ अपक्ष आमदार निवडून आले होते. या आमदारांना जवळपास १० टक्के मते मिळाली होती. यावेळी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. या बंडखोरीचा फटका दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे. (Rajastan Election 2023)

भाजपमध्ये महत्त्वाच्या मतदारसंघातच बंडखोरी झाल्याने भाजपसमोर डोकेदुखी वाढली आहे. चितौडगड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते नरपतसिंग राजवी उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे चंद्रभान सिंह आक्या यांनी बंडखोरी केली आहे. नरपरसिंग राजवी हे माजी उपराष्ट्रपती भैंरोसिंग शेखावत यांचे जावई आहेत. यामुळे भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

भाजपचे खासदार देवजी पटेल यांनाही सांचौर मतदारसंघातून बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. येथे जीवाराम चौधरी यांनी बंडखोरी केली आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार राजवर्धन राठोड यांच्यापुढेही झोटवाडा येथे तर राजपालसिंग शेखावत व आशुसिंह सुरपुरा या दोघांनी बंडखोरी केली आहे.

भाजपप्रमाणेच काँग्रेसलाही बंडखोरीचा फटका बसला आहे. शिव मतदारसंघातून सलग दहाव्यांदा निवडून आलेल्या अमीन खान यांच्यावर काँग्रेसने विश्वास दर्शविला आहे. परंतु काँग्रेसचे फतेह खान यांनी बंडखोरी केली आहे. याच मतदारसंघात भाजपचे स्वरुप सिंग खाडा यांच्याही विरोधात भाजपचे बंडखोर रविंद्र भाटी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

सवाई माधोपूर महत्वाच्या मतदारसंघात भाजपचे खासदार किरोडीलाल मीणा हे उमेदवार आहेत. त्यांना आशा मीणा यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. डिडवाना मतदारसंघातून भाजपचे जितेंद्रसिंह जोधा यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर युनूस खान यांनी बंडखोरी केली आहे.

ज्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. त्या सर्व उमेदवारांशी गेहलोत यांनी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे समजते. राजस्थानमध्ये जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेले गेहलोत यांनाही आता पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता धूसर होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT